गडचिरोलीत पाच नक्षलवादी पकडले   

चार महिला, दोन मुलांचा समावेश

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चार महिलांसह पाच नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. त्यांना पकडून देणार्‍यास ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.पोलिसांनी सांगितले की, तीन महिला आणि दोन अल्पवयीन मुलांना आम्ही ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलिसांना माहिती मिळाली की, ५० ते ६० नक्षलवादी भामरागच्या बिंंगुडा मौजा येथे एकत्र आले आहेत. ते पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. यानंतर पोलिस दलाला सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला. घटनास्थळी पोलिस आणि नक्षलविरोधी पथके पाठवण्यात आली. परिसरला वेढा घालून पाच नक्षलवाद्यांना पकडले आहे.  तीन महिलांपैकी उंगी होयाम (वय २७) हिला पकडून देणार्‍यास १६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. पल्लवी मिदयाम (वय १९) हिच्यावर ८ लाखांचे तर देवी पोडियाम (वय १९ै) वर ४ लाखांचे बक्षीस होते. तिघीही छत्तीसगढच्या रहिवासी आहेत.  अन्य दोघे अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते. त्यांची रवानगी बाल न्याय मंडळाकडे केली आहे. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यात स्वयंचलित रायफल, ३०३ रायफल., एकदा मारा करणारी बंदुक, दोन भारमार बंदुका, तीन वॉकीटॉकी संच आणि अन्य सामग्री जप्त केली. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली परिसरात नक्षलवाद विरोधी मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.
 

Related Articles